जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास  १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्यावसायिक अभ्यासक्रमांना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास १४ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण-डी. फार्म, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड कॅटरिंग हा पदवी अभ्यासक्रम आणि एमबीए-एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नीट आणि सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळेस जातवैधता प्रमाणपत्रसादर करणे बंधनकारक आहे. मात्र प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि प्रवेश प्रक्रिया मुदतीत पूर्ण होण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी प्रमाणपत्राच्या सादरीकरणासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती, पण ही मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.