अनुसूचित जाती प्रवर्गाचे अबकड मध्ये वर्गीकरण करा – प्रा.रामचंद्र भरांडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

हिंदुस्थानी राज्यघटनेत अनुसूचित जाती प्रवर्गाची आरक्षणाची तरतूद असली तरी या प्रवर्गाचा लाभ सर्वच जातींना उचित प्रमाणात होत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात मातंग समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळे मातंग समाजासह राज्यातील वंचित जातीच्या आर्थिक उन्नतीसाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाचे अबकड मध्ये वर्गीकरण करावे, असे प्रतिपादन लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या महासत्याग्रह आंदोलनाच्यावेळी मार्गदर्शन करताना केले. या महासत्याग्रह आंदोलनासाठी राज्यभरातून महिला, पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना प्रा.भरांडे म्हणाले की, राज्यात मातंग समाजासह बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत. पिडीत कुटुंबांना आर्थिक मदत देवून पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केले. महासत्याग्रह आंदोलनानंतर लोकस्वराज्यच्या वतीने जिल्हा प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये भूमिहीनांना पाच एकर जमीन देणे, राज्यातील सर्व विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांचे नावे अध्ययन केंद्र सुरु करणे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी व शिफारशी लागू करणे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये देवून सुरु करावे, त्याचबरोबर पुजा सगट, संदीप जाधव, बालाजी पारदे यांच्या मारेकऱ्यांना कउक शासन करुन या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, रुद्रवाडी, वाकडी प्रकरण, मुस्तापूर येथील बहिष्कृत कुटुंबांना शासनाने न्याय द्यावा आदी मागण्या करण्यात आली. यावेळी व्ही.जी.डोईवाड, रावसाहेब पवार, नितीन पौळ, नामदेव गायकवाड, दत्तराव गायकवाड, पंडीत वाघमारे, द्रौपदाबाई कांबळे, पी.डी.गोणारकर, रोहित लोहकरे, राजू मंगले, अर्जून गायकवाड, गंगाधर भंडारे, बालाजी टिकेकर, सचिन वाघमारे, मारोती गायकवाड, शंकरराव गायकवाड, शिवाजी कोयनार, संतोष भुयारे, साहेबराव गव्हाळकर, एन.जी.पोतरे, डी.एन.शेळके, माधव काळे, मनिषा विंâजवडे, संदीप मारे, अरविंद दस्तके यांची उपस्थिती होती.