गोव्यातील भटकी गायी-गुरे बनली मांसाहारी; मंत्री लोबो यांनी दिली माहिती

717

गोव्यातील भटकी गायी-गुरे गोशाळेत नेऊन ठेवली असता ती मांसाहार करीत असल्याचे दिसून आले आहे. गोव्याचे मंत्री मायकेल लोबो यांनी ही माहिती दिली. भटक्या गायींना आता कचऱ्यात टाकून दिलेले चिकन आणि तळलेले मासे खाण्याची सवय झाली आहे, असे मायकेल लोबो यांनी सांगितले. कळंगूट परिसरातील 76 भटकी गायी-गुरे गोशाळेत दाखल करण्यात आली. त्यांची पाहणी केली असता ही गुरे मांसाहारी झाल्याचे दिसले, असे आरोप गावात बोलताना लोबो यांनी सांगितले.

ही भटकी गायी-गुरे गवत खात नाहीत. ही गुरे हरभरा खात नाहीत. तसेच त्यांना दिलेले विशेष खाद्यही खात नाहीत, असे लोबो म्हणाले. कळंगूट आणि कांदोळी परिसरातील भटकी गायी-गुरे रेस्टॉरंटचालकांनी कचऱ्यात फेकलेले चिकन आणि मासे खातात, असे लोबो म्हणाले. आम्ही नेहमी म्हणतो, गायी-गुरे शाकाहारी असतात. मात्र कळगूंट येथील गुरे मांसाहारी आहेत. तेथील गोशाळाचालकांना ही समस्या सतावत आहे. आता गोशाळाचालकांनी या मांसाहारी गुरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे मदत मागितली आहे, असेही लोबो यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या