हनी ट्रॅपमध्ये अडकला लष्कराचा जवान, महिला आयएसआय एजंटला दिली गोपनीय माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्करातील जवान प्रदीप कुमार याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत एका महिला आयएसआय एजंटने गोपनीय माहिती काढून घेतली आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी प्रदीपला अटक केली आहे.

प्रदीप हा 24 वर्षांचा असून तो जोधपूरमध्ये तैनात होता. तो फेसबुकच्या माध्यमातून त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. त्या महिलेने तिचे नाव छदाम सांगितले होते व ती मूळची मध्य प्रदेशमधील ग्वालियरची असल्याचे सांगितलेले. तसेच ती बंगळुरू मध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला होती असे भासवलेले. त्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. त्या दरम्यान छदामने प्रदीपकडून लष्कराची काही गोपनीय माहिती काढून घेतले. ते दिल्लीला भेटले तेव्हा प्रदीपने तिला काही कागदपत्रंही दिली. दरम्यान गुप्तचर यंत्रणांना प्रदीपच्या या प्रकाराबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तत्काळ त्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांना दिली. 18 मे रोजी पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी दरम्यान कुमारने त्याचा गुन्हा कबूल केला.