
हाथरस गँगरेप आणि हत्याप्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. केंद्र सरकारने अधिसूचना काढून तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने अजून गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, आता तपासाला सुरुवात होईल. हाथरस पोलिसांकडून एफआयआरची कॉपी घेतली जाईल आणि त्यानंतरच गुन्हा दाखल होऊन तपास सुरू होईल असे सांगण्यात आले.
सीबीआयची विशेष अपराध शाखा तपास करणार की गाजियाबाद युनिट तपास करणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. या प्रकरणाचा तपास आतापर्यंत एसआयटी करीत होती. त्यांनी गावातील 40 जणांना नोटीस पाठवून अनेकांचा जबाबही घेतला होता.
























































