15 फेब्रुवारीपासून सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसई अर्थात पेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत तर बारावीची परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यासाठीचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

सीबीएसईची दहावीची परीक्षा 92 हून अधिक विषयासाठी घेतली जाणार आहे बारावीची परीक्षा 127 हून अधिक विषयांसाठी घेतली जाणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक श्याम भारद्वाज यांनी दिली. तसेच बारावीची तारीख आणि त्याचे वेळापत्रक हे जेईई मेनसह स्पर्धात्मक परीक्षांची काळजी घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांची चांगली तयारी करता यावी म्हणून वेळापत्रक खूप आधीच जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.