सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दहावीची विज्ञानाची परीक्षा 15 मे रोजी होणार होती, मात्र ती आता 21 मे रोजी होणार आहे तर 21 मे रोजी होणारा गणिताचा पेपर आता 2 जूनला होणार आहे. बारावी विज्ञान शाखेतील फिजिक्सचा पेपर 13 मे ऐवजी 8 जूनला तर गणिताचा पेपर 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. कॉमर्स शाखेचा मॅथ्स आणि ऍप्लाईड मॅथ्सची परीक्षा 31 मे रोजी पार पडेल. तसेच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची भूगोलाची परीक्षा 2 जूनऐवजी 3 जूनला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या