विषाणूवर 13 महिने काम, तरी कोरोनाचा संसर्ग नाही; सीसीएमबी लॅब हैदराबादचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी)ही जागतिक पातळीवरील प्रयोगशाळेत 660 लोक दररोज एकत्र काम करतात. कोरोनाच्या काळातही त्यांना ना वर्क फ्रॉम होमची सुविधा नाही किंवा कोणती सुट्टी. गेल्या 13 महिन्यांपासून कोरोना विषाणूवर संशोधन करणारे हे कर्मचारी कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

जगातील प्रत्येक विषाणू तयार करणाऱया आणि त्यावर प्रयोग करणारी हैदराबाद येथील सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) ही जागतिक पातळीवरील प्रयोगशाळा आहे. ‘सीसीएमबी’मध्ये सध्या कोरोना विषाणूवर संशोधन सुरू आहे. व्हायरसवर संशोधन करणे, लस पंपन्यांना मदत करणे हे त्यांचे रोजचे काम आहे. परंतु संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे गेल्या 13 महिन्यांत एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. ना शास्त्रज्ञ, ना तरुण संशोधक किंवा सहायक कर्मचारी. आतापर्यंत कोरोना संसर्गाची एकही घटना घडलेली नाही.

आम्ही सामान्य माणसांप्रमाणेच कुटुंबाला भेटतो. सतर्क राहून कार्यालय-प्रयोगशाळेत काम करतो. प्रत्येक संशोधन सांगते की, केवळ 15 दिवसांसाठी सर्व जणांनी योग्य प्रकारे मास्क घाला. एकमेकांमध्ये अंतर ठेवा आणि सॅनिटाइझ करत राहा. असे केल्यास कोरोना संसर्गापासून निश्चितच बचाव होईल, असे येथील संशोधक सांगतात.

भिंतीवर लिहिलेल्या, ‘सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुणे.’ या घोषवाक्याची सर्व पथकाला याची जणू सवयच झाली आहे. आम्ही तर विषाणू बनवत आहोत, पण त्याचे आम्ही वाहक (कॅरिअर) बनलो नाही. ही सतर्कता लक्षात घेतली पाहिजे.

– राकेश मिश्रा, संचालक सीसीएमबी 

कॅण्टीनमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन 

प्रत्येक लॅबच्या नियमाप्रमाणेच येथे जेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. कॅण्टीनमध्ये जेवणाची बंद पाकिटे दिली जातात. प्रत्येक टेबलमध्ये तीन मीटरचे अंतर आहे. प्रत्येक टेबलाचा व्यास दोन मीटर आहे. त्यामुळे टेबलाच्या चारही बाजूला उभे असलेले लोक एकमेकांपासून तीन फूट दूर राहतात.