
तामीळनाडूमधील कन्नूर येथे झालेल्या भीषण अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 वरिष्ठ अधिकाऱयांचा मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला अहे. यात या अपघातामागील नेमक्या कारणांचा उलगडा झाला आहे. चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदलेलं हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये प्रवेश हे कारण असल्याचं म्हटले आहे.



























































