#GOODBYE2019 – या कलाकारांनी जगाला केले अलविदा

2019 या वर्षी चित्रपटसृष्टीने बरेच प्रसिद्ध कलाकार गमावले. या कलाकारांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. 

श्रीराम लागू – 

dr-shriram-lagoo

मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट, चतुरस्र अभिनेते, परखड विचारवंत, आपल्या अद्वितीय अभिनय सामर्थ्याने एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला हिमालयाची उंची देणारे ज्येष्ठ रंगकर्मी नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे 17 डिसेंबरला वृद्धापकाळामुळे निधन झाले.  लागूंनी ‘पिंजरा’मधील ‘मास्तर’ आणि ‘सिंहासन’मधला ‘मंत्री’ जबरदस्त पद्धतीने उभा केला. त्यांचा नटसम्राट देखील प्रचंड गाजला होता.

विजू खोटे –

12viju-khote2

शोलेमधील कालिया या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे 30 सप्टेंबर 2019 ला निधन झाले. अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी निगेटीव्ह भूमिका केल्या आहेत.

विद्या सिन्हा –

vidya-sinha

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे 15 ऑगस्टला निधन झाले. त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. यही सच है या चित्रपटातील त्यांचा अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

वीरू कृष्णनन –

veeru-krishnan-new

अभिनेते व प्रसिद्ध कथ्थक गुरु वीरू कृष्णनन यांचे 7 डिसेंबरला निधन झाले. वीरू कृष्णनन यांनी ‘ राजा हिंदुस्‍तानी’, ‘इश्‍क’ आणि ‘अकेले हम अकेले तुम’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शौकत आझमी –

shoukat-azami-1

अभिनेत्री शबानाआझमी यांच्या आई व प्रसिद्ध अभिनेत्री शौकत आझमी यांचे 22 नोव्हेंबरला निधन झाले. ‘उमराव जान’, ‘गरम हवा’ आणि सागर ‘बाजार’ या चित्रपटात काम केले आहे. राणी मुखर्जीच्या साथिया चित्रपटात त्या अखेरच्या दिसल्या होत्या

वेणू माधव –

venu-madhav

तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते वेणू माधव यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता. वेणू यांना किडनी व जठराचा आजार होता.

गिरीश कर्नाड –

girish-karnad

प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचे 10 जून रोजी निधन झाले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेले कर्नाड यांनी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार अशा वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत.

वीरू देवगण –

veeru-devganअजय देवगणचे वडील वीरू देवग हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन व अॅक्शन कोरियोग्राफर होते. वीरू देवगण यांचे 27 मे रोजी निधन झाले.

राजकुमार बडजात्या –

rajkumar-badjatya

प्रसिद्ध दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे वडिल व प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार बडजात्या यांचे 21 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या राजश्री प्रोडक्शनने अनेक हिट कौटुंबिक चित्रपट दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या