बिहारमध्ये जातीय जनगणना होणार; सर्वपक्षीयांच्या बैठकीत एकमताने मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्यात जातीय जनगणना करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जातीय जनगणनेच्या मुद्दय़ावर सुरुवातीला भाजपची विरोधाची भूमिका होती. मात्र नंतर आपला या जनगणनेला कधीही विरोध नव्हता, असे सांगून भाजपने बिहार विधानसभेतील यासंबंधी ठरावाला पाठिंबा दिला होता.

बिहारमध्ये नजीकच्या काळात जातीय जनगणना केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी जाहीर केले. आधी पॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला जाईल, नंतर जातींची गणना सुरू करण्यात येईल. जातीय जनगणना करणारे बिहार हे दुसरे राज्य असेल. यापूर्वी कर्नाटक राज्याने जातीय सर्व्हे केला होता; परंतु त्याचा अहवाल अजूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. आम्ही राज्यातर्फे पेंद्र सरकारला यासंदर्भात विनंती केली होती. परंतु पेंद्राकडून अद्याप आमच्या विनंतीवर कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही स्वतŠच जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.