रविवारी मध्य व हार्बरचा मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर स.10:55 ते दु. 3:55  या वेळेत ब्लॉक असेल. सीएसएमटीहून डाऊन दिशेला धिम्या मार्गाने जाणार्‍या लोकल स.10:48 ते १०.४८ ते दु. 3:49 वाजताच्या दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद र्गाने वळविल्या जातील.

तसेच या गाड्यांना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबा दिला जाईल. त्यानंतर पुन्हा त्या पुन्हा डाऊन धिम्या मार्गाने धावतील. घाटकोपरहून सुटणार्‍या अप धिम्या लोकल स.10:41 ते दु.3:52 वा.पर्यंत विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गाने वळविण्यात येतील. हा

र्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन आणि अप मार्गावर स. 10 ते सायं.  6 दरम्यान ब्लॉक राहणार आहे. काही अंतराने पनवेलसाठी कुर्ला स्थानकातून फलाट क्र.8वरून स्पेशल ट्रेन सोडली जाईल