मध्य रेल्वेवर मध्यरात्री पॉवर ब्लॉक,हार्बरची शेवटची लोकल आज रात्री सवाअकराला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला येथे पादचारी पुलाचे गर्डर लाँच करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील शनिवारी रात्री शेवटची लोकल 11.14 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे. तर मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱया अनेक एक्सप्रेस गाडय़ा मुलुंड-माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरा कार्यालयातून घरी परतणाऱया हर्बर मार्गावरील प्रवाशांची मोठी काsंडी होणार आहे.

मध्य रेल्वे 140 टन क्षमतेचे रेल्वे व्रेन वापरून कुर्ला स्थानकावर 8 मीटर रुंद पादचारी पुलाचे प्लेट गर्डर टाकण्यासाठी अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री 11.50 ते पहाटे 4.30 या वेळेत अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल.

डाऊन हार्बर मार्गावर शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री 11.14 वाजता पनवेलसाठी सुटणार आहे. तर वडाळा येथून 11.8 वजता पनवेलसाठी शेवटची लोकल सुटेल.

मेनलाईनवरील कोणार्क एक्सप्रेस, हावडा–मुंबई मेल, मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.