
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या असलेला 38 टक्के महागाई भत्ता वाढून 42 टक्के इतका होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47.58 लाख कर्मचाऱ्यांना, तर 69.76 लाख पेन्शनधारकांना होईल. डीएमध्ये झालेली ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे.



























































