चीनवर केंद्र सरकारची आणखीन एक डिजिटल स्ट्राईक, 43 अ‍ॅप्सवर बंदी

चीनवर केंद्र सरकारने आणखीन एक डिजिटल स्ट्राईक केला आहे. हिंदुस्थानच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेसाठी धोका असल्याचे सांगत मोदी सरकारने 43 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अलीबाबा वर्कबेंच, अली पे कॅशिअर, डिलिव्हरी अ‍ॅप आणि स्कॅन व्हिडीओ सारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आयटी कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

बंदी घातलेल्या अ‍ॅप्‍सपैकी काही जुने अ‍ॅप्स देखील आहेत, परंतु बरेच अ‍ॅप्‍स हे असे आहेत की जे सहायक अॅप म्हणून काम करतात. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये अलीबाबाचे अ‍ॅप्स आहेत. याआधीही अलीबाबाच्या प्सवर बंदी घालण्यात आली होती. नव्याने बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये अलीबाबाच्या AliSuppliers, AliExpress आणि AliPay Cashier सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

केंद्र सरकारने बंदी घातलेले अ‍ॅप्स

apps-ban-in-india-677x1024

  • अली सप्लायर्स मोबाईल अ‍ॅप
  • अलिबाबा वर्कबेंच
  • अली एक्सप्रेस
  • अलिपा कॅशिअर
  • लालामूव इंडिया
  • ड्राईव्ह विथ लालामोव इंडिया
  • स्नॅक व्हिडिओ
  • कॅमकार्ड-बिझिनेस कार्ड रीडर
  • कॅम कार्ड- बीसीआर वेस्टर्न
  • साऊल
  • चायनजी सोशल
  • आशियन डेट
  • फ्लर्ट विश
  • गायज ओनली डेटिंग
  • टूबिट
  • वी वर्क चायना
  • फर्स्ट लव लाईव्ह
  • रीला
  • कॅशिअर वॉलेट
  • मँगो टीव्ही
  • एमजीटीव्ही
  • वी टीव्ही
  • वीटीव्ही लाइट
  • लकी लाईव्ह
  • टाओबाओ लाईव्ह
  • डिंग टॉक
  • आईडेंटिटी वी
  • आयसोलँड 2
  • बॉक्स स्टार
  • हॅपी फिश
  • जेलीपॉप मॅच
  • मंचकिन मॅच
  • कॉनक्विस्टा ऑनलाइन
आपली प्रतिक्रिया द्या