दिलासादायक बातमी; कोरोनाचे मृत्यू रोखण्यात हिंदुस्थानला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधातील लढय़ात हिंदुस्थानला चांगले यश मिळाले आहे. देशात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण झपाटय़ाने खाली आले असून सध्या या विषाणूचा मृत्यूदर 2.28 टक्क्यांवर आला आहे. हा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी केला. चाचण्यांचे अधिक प्रमाण क त्यातून वेळीच निदान झाल्यानंतर केले जाणारे प्रतिबंधात्मक उपाय यामुळे अनेकांनी विषाणूला हरकले. परिणामी, देशाचा मृत्यूदर नियंत्रणात राहिला, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आरोग्य मंत्रालयाने ही दिलासादायक आकडेवारी जाहीर केली. कोरोनाच्या रिवव्हरी रेटमध्येही चांगली सुधारणा झाली असून तो 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला कोरोनावर मात केलेल्या लोकांची एकूण संख्या 9 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोनाचे 4 लाख 85 हजार 114 इतके सक्रीय रुग्ण आहेत. या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 4 लाख 32 हजार 453 ने अधिक आहे. सर्क सक्रीय रुग्णांवर रुग्णालय तसेच घरातील स्कतंत्र खोलीत प्रभावी उपचार सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

सलग चौथ्या दिवशी 30 हजारांहून अधिक लोकांची कोरोनावर मात

देशभरात सलग चौथ्या दिवशी 30 हजारांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. सोमवारी 31,991 कोरोनाग्रस्त यशस्की उपचार घेऊन रुग्णालयातून घरी परतले. त्यामुळे देशातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 17 हजार 567 झाली आहे.