आज-उद्या केंद्रीय पथक अतिवृष्टीग्रस्त भागात

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. त्या पथकाकडून उद्यापासून नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना त्यासंदर्भात पूर्वकल्पना दिली आहे. उद्या आणि परवा असे दोन दिवस हे पथक पाहणी करणार आहे.

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार केंद्र सरकारने हे पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. या पथकामध्ये पृषि विभागाचे संचालक व कापूस विकास मंडळाचे डॉ. ए. एल वाघमारे, जलशक्ती मंत्रालयाचे पंद्रप वी. पटेल, सत्येंद्र प्रताप सिंग, विशाल पांडेय, अभिषेक पुमार करण सरीन, डॉ. एसव्हीएसपी शर्मा यांचा समावेश आहे.

मराठवाडा व अन्य अतिवृष्टीग्रस्त भागात किती आणि कोणत्या प्रकारचे नुकसान झाले त्याची माहिती संबंधित जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवली आहे. तरीही पेंद्रीय पथकाकडून त्याचे स्वरुप समजून घेतले जाणार आहे. राज्य सरकारकडे असलेला तपशील व आकडेवारी तसेच प्रत्यक्ष झालेले नुकसान याची माहितीही हे पथक घेणार आहे.