मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लेट मार्क तसा नवीन राहिलेला नाही. अनेकदा गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असतात. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. अप मार्गावरची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने होत आहे. त्यातच AC लोकलमुळे साध्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसावे लागते, असं मत प्रवासी व्यक्त करता. यावेळात स्थानकांमधील गर्दी देखील वाढत जाते, असं प्रवासी सांगतात.