मध्य रेल्वेच्या दर महिन्यास सरासरी 100 एटीव्हीएम मशीन बंद

246

मध्य रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’वर आधारित एटीव्हीएम मशीन बसवण्यात आल्या आहेत. मात्र दर महिन्याला सरासरी 100 मशीन बंद असतात. तर दिवसाला सरासरी 4.16 टक्के मशीन बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते.

काही मशीनच्या टचक्रीन काम न करणे, तर काहींचे तिकीटचा कागद नीट न कापणे अशा अनेक तक्रारींमुळे या मशीन बंद अवस्थेत असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. 2007 मध्ये ‘ऍक्सेल’ कंपनीच्या ‘एटीव्हीएम’ मशीन वापरल्या जायच्या. या मशीनची ‘टच क्रीन’ लवकर खराब व्हायची. त्यामुळे 2012-13पासून ‘फोर्ब्ज’ कंपनीच्या एटीव्हीएम मशीन आणण्यात आल्या. या मशीनवर सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने निवृत्त कर्मचाऱयांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ‘स्मार्ट कार्ड’ नाही त्यांनादेखील तिकीट विकत घेता येते. सध्या मध्य रेल्वेवर विविध स्थानकांवर एकूण 602 एटीव्हीएम मशीन बसवण्यात आल्या आहेत. 2019च्या जून महिन्यात त्यापैकी 125 मशीन विविध कारणांनी बंद पडल्याची आकडेवारी आहे.

हेही वाचा-  लोकलवर पडतात अँटेना, बॅग, वायर, छत्र्या, कपडे; मध्य रेल्वेने जनप्रबोधनासाठी पथक नेमले

‘एटीव्हीएम’ मशीनमार्फत होणारी तिकीट विक्री सरासरी 23 ते 26 टक्के इतकी आहे, तर जेटीबीएसमार्फत 11 ते 12 टक्के तिकीट विक्री होते. तर सर्वाधिक तिकीट विक्री तिकीट खिडक्यांवरून 53 ते 56 टक्के होते. तर यूटीएस ऍपवरून केवळ 5 ते 6 टक्के तिकिटांची विक्री होत असते.

जादा सवलत देण्याची मागणी
एटीव्हीएम स्मार्ट कार्डावरून तिकीट काढताना पूर्वी 5 टक्के सवलत दिली जायची. आता ती 3 टक्के करण्यात आली आहे तर यूटीएस ऍपवर तिकीट खरेदीसाठी मात्र 5 टक्केच सूट दिली जात असल्याने एटीव्हीएम स्मार्ट कार्डावरही 5 टक्के सवलत द्यावी तसेच या स्मार्ट तिकिटांच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करावेत, त्याची किंमत कमी करावी, अशी मागणी रेल्वेने ‘क्रिस’ या संस्थेकडे केली आहे.

महिना   एकूण मशीन    एकूण बिघाड     रोजची सरासरी
जाने. 2019      602         104             3.35 टक्के
फेब्रु. 2019       —         118             4.21 टक्के
मार्च 2019       —         165             5.32 टक्के
एप्रिल 2019      —         116             3.86 टक्के
मे 2019       —           75             2.41 टक्के
जून 2019       —         125             4.16 टक्के

आपली प्रतिक्रिया द्या