लोकलवर पडतात अँटेना, बॅग, वायर, छत्र्या, कपडे; मध्य रेल्वेने जनप्रबोधनासाठी पथक नेमले

430

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात पेटोंग्राफवर अज्ञाताकडून ट्रॉली बॅग टाकल्याने आग लागल्याची घटना घडल्याने आता रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे वस्तू टाकू नयेत यासाठी जनप्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी स्पेशल टीम स्थापण्यात येणार असून झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन प्रचार करण्यात येणार आहे.

हार्बरच्या वाशी रेल्वे स्थानकांत पनवेल लोकल शिरताच तिच्या पेंटोग्राफवर आगीच्या ज्वाळा उसळल्याची घटना बुधवारी सकाळी 9.23 वाजता घडली. या घटनेचा तपास करण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले तरी नेमकी कुठे ही बॅग टाकण्यात आल्याचे फुटेज सापडले नाहीत. तसेच कोणी प्रत्यक्षदर्शीही पुढे न आल्याने आरपीएफचे अधिकारी बुचकळ्यात सापडले आहेत. या प्रकरणात जीआरपीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे मागे एकदा कोणी तरी कमरेचा पट्टा पेटोंग्राफवर टाकल्याने स्पार्किंग झाले होते. तसेच मस्जिद येथे डिश अँटेना पडल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. अशा प्रकरणात सहा महत्वाच्या घटनांपैकी तीन प्रकरणात आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या