‘मरे’चे रडगाणे, वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर अभूतपूर्व गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. गाड्या उशिराने असल्याने कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि लालबागसह इतर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची परेळ, करीरोड रेल्वे स्थानकावर अभूतपूर्व गर्दी दिसत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.