जमीनच मिळत नाही म्हणून बुलेट ट्रेनचा लेटमार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळणे कठीण झाले आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन अद्याप पूर्णपणे संपादित करता आलेली नाही. 1380 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. परंतु त्यातील फक्त 39 टक्केच जमीन संपादित करता आल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘लेट’ होत आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जमीन संपादित केली जाणार आहे. गुजरातमधील 940 हेक्टर जमिनीपैकी 471 हेक्टर जमीन आतापर्यंत संपादित करता आली आहे तर महाराष्ट्रातील 431 हेक्टरपैकी फक्त 66 हेक्टर जमीन ताब्यात मिळाली आहे. दादरा आणि नगर हवेली येथील 9 हेक्टर जमीनही या प्रकल्पासाठी आवश्यक आहे पण त्यातील एक इंचही जमीन अद्याप सरकारला मिळवता आलेली नाही.