
लॉकडाऊनमुळे बंद केलेली मध्य रेल्वेची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दिन (दिल्ली) स्पेशल राजधानी एक्सप्रेस 30 डिसेंबरपासून पुन्हा आपल्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. राजधानी एक्सप्रेस आठवडयातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी चार दिवस धावणार आहे. नाशिक मार्गे जाणार्या या मध्य रेल्वेच्या पहिल्याच राजधानी एक्स्प्रेसचे गेल्यावर्षी 19 जानेवारी 2019 रोजी उद्घाटन झाले होते.
ट्रेन क्र. 01221 : राजधानी स्पेशल 30 डिसेंबरपासून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार सीएसएमटीहून दु.4.10 वा. सुटून दुसर्या दिवशी स.11 वा. हजरत निजामुद्दिनला पोहचेल.
ट्रेन क्र. 01222 : परतीच्या प्रवासाची राजधानी स्पेशल 31 डिसेंबरपासून दर मंगळवार, गुरूवार, शनिवार आणि रविवार हजरत निजामुद्दिनहून दुपारी 4.55 वा. सुटेल आणि सीएसएमटीला दुसर्या दिवशी स.11.50 वा. पोहचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झाँशी आणि आग्रा कन्टोनमेंट
डब्यांची स्थिती : एक एसी फर्स्टक्लास, पाच एसी टू टीयर, 11 एसी थ्री टीयर आणि एक पॅण्ट्री कार.
ट्रेन क्र. 01221 राजधानीच्या तिकीटांचे आरक्षण कॅटरिंगचा चार्ज वगळून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रातून तसेच आयआरसीटीसीच्या बेवसाईटवरून 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. केवळ कन्फर्म तिकीट असणार्यांनाच प्रवासाची अनुमती असणार आहे. प्रवाशांना कोविड-19 संदर्भातील सर्व नियम व सोपस्कार पाळावे लागणार आहेत.




























































