रेल्वेच्या 12 स्टेशनवर सॅनेटायझेशन मशीन, टू वे माईकचाही वापर

628

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने कोरोनाच्या संकटकाळात रेल्वे आरक्षण कर्मचारी आणि प्रवाशांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने बारा आरक्षण केंद्रांवर आठवडाभरापासून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशी आणि कर्मचारी यांना दूरवरून संवाद साधता यावा म्हणून टू वे माईक सिस्टीम, तर नोटांपासून संसर्ग टाळण्यासाठी अल्ट्राव्हॉयलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीनचा वापर सुरू केला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात सध्या लांब पल्ल्याच्या सुमारे 19 गाडय़ा सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे. मात्र, संवाद साधताना अडचणी जाणवत असल्याने आरक्षण केंद्रांच्या खिडकीत टू वे माईक सिस्टीम बसविण्यात आली आहे.

आरक्षण कार्यालयांमध्ये चलनी नोटांपासून कर्मचाऱयांना पुठलाही संसर्ग होवू नये या उद्देशाने अल्ट्राव्हॉयलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावले आहे. तसेच तिकीट तपासनीसांना फेसशिल्ड आणि भिंग पुरवले आहे. या सुविधा भुसावळ मंडळातील नाशिक, मनमाड, जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, नांदगाव, अकोला, अमरावती, खांडवा, मलकापूर, ब्रहाणपूर, निपानगर येथील बारा आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असल्याची माहिती भुसावळ मंडळाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या