कोकणात गणपतीसाठी मध्य रेल्वेच्या चार स्पेशल फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कोकणात यंदा गौरी-गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेने आणखीन चार स्पेशल गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या आता १७६ इतकी होणार आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी ते सावंतवाडी रोड आणि पुणे-झाराप अशा चार फेऱ्या सोडल्या असून त्यांचे आरक्षण २ ऑगस्टपासून खुले होईल.

  • ट्रेन क्र. ०१०१३

मुंबई-सावंतवाडी-मुंबई स्पेशल (२ फेऱ्या) ही गाडी गुरुवार १३ सप्टेंबर रोजी सीएसएमटीहून रात्री ९.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

  • ट्रेन क्र. ०१०१४

ही परतीच्या प्रवासाची ट्रेन शुक्रवार १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडीहून सकाळी १० वाजता सुटून सीएसएमटीला त्याच दिवशी रात्री ११ वाजता पोहोचेल.

  • थांबे

दादर (ट्रेन क्र. ०१०१४) ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • ट्रेन क्र. ०१४२१

पुणे-झाराप-पुणे (२ फेऱ्या) ही ट्रेन सोमवारी १० सप्टेंबर रोजी पुण्याहून रात्री ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता झारापला पोहोचेल.

  • ट्रेन क्र. ०१४२२

ही परतीची गाडी मंगळवार दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता झारापहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पुण्याला पोहोचेल.

  • थांबे

चिंचवड, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, बिलवडे, राजापूर रोड,  वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळ.

दोन स्लीपर क्लास कोचेस

कोकणात प्रवाशांच्या गर्दीमुळे ट्रेन क्र. ०१०३९ / ०१०४० एलटीटी-झाराप-एलटीटी स्पेशल या ट्रेनना जादा डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच एक एसी-३ टियर आणि एक जनरल सेकंड क्लास असे दोन डबे.

१) ट्रेन क्र. ०१४३१/०१४३२ पुणे-सावंतवाडी-पुणे स्पेशल.

२) ट्रेन क्र. ०१४३३/०१४३४ पनवेल-सावंतवाडी-पनवेल स्पेशल.

३) ट्रेन क्र. ०१४३५/०१४३६ पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल स्पेशल.

४) ट्रेन क्र. ०१४४७/०१४४८ पुणे-सावंतवाडी-पनवेल स्पेशल

५) ट्रेन क्र. ०१४४९/०१४५० पनवेल-रत्नागिरी-पुणे स्पेशल यांना जोडण्यात येतील.