
मध्य रेल्वेने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेत पाच डिव्हिजनमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत तब्बल 61 लाख 89 हजार 338 रुपयांची 2,577 तिकिटे जप्त केली आहेत. मध्य रेल्वेच्या पाच डिव्हिजनमध्ये गैरप्रकारे रेल्वे तिकिटे बुक करणाऱयांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. त्यात बनावट युजर आयडी वापरून रेल्वेची तिकिटे आरक्षित करणे, तिकिटांचे बेकायदेशीर हस्तांतरण करणे आदी प्रकारे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यात पाच डिव्हिजन मिळून एकूण 61 लाख 89 हजार 338 रुपयांची एकूण 2,577 तिकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

























































