मध्य रेल्वेच्या जागेत चक्क हवामान केंद्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

हवामान खात्याचा अतिवृष्टीचा अंदाज चुकला असला तरी अतिवृष्टीचा जादाच धसका यंदा मध्य रेल्वेने घेतला आहे. हवामान खाते रेल्वेच्या हद्दीतच आपले छोटेखानी ‘वेदरस्टेशन’च उभारणार आहे. आपले ऑटोमेटिक रेन गेज उपकरण उभारण्यासाठी हवामान खात्याने जागा मिळावी यासाठी मध्य रेल्वेला पत्रच धाडले आहे. हवामान खात्याने अधिक अचूकता यावी यासाठी जीपीएस आधारित ‘ऑटोमेटिक रेन गेज’हे उपकरण रेल्वेच्या हद्दीत उभारण्यासाठी जागेची मागणी केली असून तसेच पत्रच मध्य रेल्वेला पाठविले आहे. हे उपकरण पावसाची घनता मोजून अचूक अंदाज वर्तविण्यास हवामान खात्याला मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेच्या मार्गांवर कुठे, कशाप्रकारे ही उपकरणे बसवता येतील यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.