
तौकते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक रत्नागिरीत आले होते. या पथकाने मिरकरवाडा बंदरात जाऊन मच्छिमारांच्या नुकसानीची पहाणी केली. त्यानंतर आंबा बागायतदारांशी त्यांनी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तौकते चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची माहिती दिली.
यावेळी समितीचे प्रमुख अशोककुमार परमार, अर्थ विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय वीज बोर्डाचे अधीक्षक अभियंता जे. के. राठोड, कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग,कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, मत्स्य विभागाचे संशोधक अशोक कदम उपस्थित होते.




























































