ब्युटी अ‍ॅडव्हान्स, नर्सिंग असिस्टंटमधील यशस्वी विद्यार्थिनींना आज प्रमाणपत्रांचे वाटप, रश्मी ठाकरे यांची उपस्थिती

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे कौशल्य निकेतनतर्फे ब्युटी अ‍ॅडव्हान्स, नर्सिंग असिस्टंट कोर्समध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींना उद्या, बुधवारी सकाळी 11.30 वाजता शिवसेना भवन येथे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि फादर अ‍ॅग्नलचे फादर व्हेलेरियन डिसुझा हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.