
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल 12 जूनपर्यंत जाहीर होईल अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. तर जूनच्या पहिल्या आठवडय़ात अभियांत्रिकी प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना मोठा फटका बसला होता. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग 1 नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रवेश प्रक्रिया उशिरा होवूनही प्रवेशात वाढ झाली होती.
- मागील वर्षी अभियांत्रिकीच्या 1 लाख 45 हजार 201 जागा होत्या त्यापैकी 1 लाख 09 हजार 499 जागांवर प्रवेश झाले होते. सुमारे 36 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.






























































