
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून चोरट्यांनी हिसकावल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे .सोमवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास चिंचवडच्या पवनानगरमधील बिजलीनगर रोडवर घडली आहे. भीमाबाई परमेश्वर सुरवसे (वय 46, रा. वेताळनगर, चाफेकर चौक, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भीमाबाई परमेश्वर सुरवसे सोमवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास बिजलीनगर रोडने पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरली दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि पळ काढला. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

























































