पादचारी महिलेचे 90 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. याप्रकरणी कर्वेनगर येथील एका 42 वर्षांच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला शैलेश सोसायटी कर्वेनगर येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन दुचाकीस्वारीांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने महिलेच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत.