पुण्यातील सुतारदरा परिसरात महिलेचे मंगळसुत्र हिसकविले

दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील 50 हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धटना पुण्यातील सुतारवाडी येथे घडला. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तक्रारदार आणि त्यांची मुलगी दुचाकीवरून त्यांच्या आईकडे जात होत्या. त्यावेळी सुतारदरा परिसरातील सुदाम निम्हण चौक येथे मोटारसायलवरून आलेल्या चोरट्याने गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण, आरोपी तोपर्यंत पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रुगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या