‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांना मिळाली प्रेमाची भेट

1573

‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांना एक छान सरप्राईज वाहिनीकडून मिळालं. नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स 2019च्या मंचावर सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे या विनोदवीरांची भेट त्यांच्या मातोश्रींशी करून देण्यात आली. या सोहळ्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची या कलाकारांच्या आईशी ओळख होणार आहे. या विनोदवीरांच्या हस्ते त्यांच्या आईंना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खुद्द आईच्या तोंडून कौतुक आणि आतापर्यंतच्या संघर्षाची गोष्ट ऐकताना नेहमी सगळ्यांना हसवणाऱ्या या कलाकारांचे डोळे मात्र पाणावले. झी मराठी अवॉर्ड्स सोहळा 20 तारखेला सायंकाळी 7 वाजता प्रसारित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या