‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नवरात्रीची धूम

1888

येत्या आठवडय़ात थुकरटवाडीतील विनोदवीर नवरात्री साजरी करणार आहेत आणि त्यासाठी या मंचावर प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, स्नेहलता वसईकर, ऋतुजा बागवे, हेमांगी कवी, सायली संजीव, भार्गवी चिरमुले, किशोरी आंबिये आणि गायिका सावनी रवींद्र हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवातच या अभिनेत्री एक धमाकेदार गरबा-दांडिया करून करणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या या नवरात्री विशेष भागात विनोदवीर ‘हम पाच’ या कार्यक्रमावर आधारित स्पूफ ’हम पांचट’ सादर करणार आहेत, ज्यामध्ये कुशल बद्रिके अशोक सराफ तर भाऊ कदम त्यांच्या बायकोची भूमिका साकारतील. त्यामुळे प्रेक्षक हसून हसून लोटपोट होणार यात काहीच शंका नाही.

इतकेच नव्हे तर अभिनेत्री किशोरी आंबिये सर्व प्रेक्षकांसोबत नवरात्रीतील मजेदार किस्से शेअर करतील. नवरात्रीत काही जण ऑफबीट गरबा कसे नाचतात, काही कपल कसे मजेशीर दांडिया खेळतात याचे प्रात्यक्षिक किशोरीताई मंचावर देताना दिसतील. त्यामुळे ‘पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न’ 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

आपली प्रतिक्रिया द्या