श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, चाळीसगावचा सुपुत्र यश देशमुख शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरच्या एचएमटी परिसरात अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात यश देशमुख या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीर मरण आले. दहशतवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत आणखी एक जवान शहीद झाला.

कश्मीर खोऱयात ‘ऑपरेशन ऑल आऊट’मुळे बिथरलेल्या अतिरेक्यांनी लष्कराला निशाणा बनवणे सुरू केले आहे. गुरुवारी अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एचएमटी परिसरात लष्कराच्या पथकावर हल्ला केला. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात यश देशमुख आणि एक जवान गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोन्ही जवानांचा मृत्यू झाला.

यश हा जळगाव जिह्यातील चाळीसगाव तालुक्याचा सुपुत्र असून गेल्या वर्षीच तो लष्करात तैनात झाला होता. अवघ्या 21 वर्षांच्या यशला असे वीरमरण आल्याने चाळीसगावात शोककळा पसरली आहे.