पणजीमध्ये खडूपासून बनवलेला गणराया देतोय सामाजिक संदेश

128

सामना प्रतिनिधी, पणजी

गोव्यात गणेशोत्सवात घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात पूजले जातात. अलिकडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होऊ लागले आहेत. राजधानी पणजी मधील मळा भागातील युवा मंडळाने 5 हजार खडूपासून साकारलेल्या साडे आठ फुटी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

युवा मंडळाने 1 महिना राबून 5 हजार खडूंच्या साहाय्याने ही मूर्ती साकारली आहे. खडूचे टिकली एवढे तुकडे करून त्यापासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी गणपती समोरची घंटा वाजवली की गणपती आपल्या पाटीवर भक्तांसाठी संदेश लिहायला सुरुवात करतो. हा संदेश गणपती समोर बसलेल्या उंदीर मामाकडे असलेल्या बॉक्समधून बाहेर पडतो. यात हेल्मेट वापरा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव असे सामाजिक संदेश दिलेले असतात. लहानथोरांसह सगळ्यांनाच ही संकल्पना आवडली असून गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.

summary- chalk ganesha in panaji

आपली प्रतिक्रिया द्या