भरदिवसा युवकावर गोळीबार, बल्लारपुरातील बहुरीया हत्याकांड पुन्हा चर्चेत

चंद्रपुर शहरातील मध्यभागी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी 12.39 च्या सुमारास घडली आहे. या गोळीबारात युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. युवक आकाश अंदेवार (32) असे जखमी युवकाचे नाव आहे.

या घटनेमुळे 11 महिन्यांपूर्वी बल्लारपुरात घडलेले सूरज बहुरीया हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. दुपारच्या सुमारास वर्दळीचे स्थान असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आकाश अंदेवार या युवकावर ऐका बुरखाधारीने गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केला. आकाशने बचावासाठी लगतच्या मोबाईल शॉपीचा सहारा घेतला. उजव्या हातावर एक व पाठीवर 2 गोळ्या लागल्याने तो जखमी झाला. घटनास्थळी गर्दी झाल्याने गोळीबार करणारा गुन्हेगार पळ काढण्यात काढण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या