चंद्रकांत हंडोरे यांना ठार मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नीलेश नानचे याने ही धमकी दिली असून त्याने संदीप गोरे याला हंडोरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश नानचे याचे हंडोरे यांच्यासोबत राजकीय वैमनस्य आहे. शिवाय हंडोरे यांच्या प्रभावामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाचे तिकीट मिळणार नाही असा नीलेशचा ठाम समज होता. या रागातून नानचे याने हंडोरे यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संदीप गोरे याला हंडोरे यांच्या हत्येची सुपारी दिली. याप्रकरणी हंडोरे यांनी तक्रार दिल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी नीलेश नानचे याच्याविरोधात कलम 115, 120 (ब), 504 (2) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नानचे हा आधी हंडोरे यांचा कार्यकर्ता होता असे सांगण्यात येते.