
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. राज्यपालांचा जाहीर केलेला निधी तक्रारदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल त्यामधून कुठल्या प्रकारच्या कर्जाची वसुली होणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पिकांचेच फक्त नुकसान झाले नाही तर भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा विश्वास असल्याचे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले.
लातूर तालुक्यातील पेठ, बोरी, औसा तालुक्यातील हासाळा, हासेगाव, हासेगाव तांडा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर. चाकूर तालुक्यातील नळेगाव, मोहदळ, रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील नुकसानीची पाहणी केली. सोयाबीन, ज्वारी, टोमॅटो, भेंडी अशा भाजी पाल्याचे नुकसान झाले आहे. आज पर्यंत काहीच मदत मिळाली नाही असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
या पहाणी दौऱ्यामध्ये चंद्रकांत खैरे, जयदत्त क्षिरसागर, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, पप्पू कुलकर्णी, सतिष शिंदे, विष्णू साबदे, जयश्री उटगे, दिलीप सोनकांबळे, श्रीमंत समुद्रे, बालाजी रेड्डी, गोपाळ माने, विरभद्र गादगे, विश्वनाथ स्वामी , रमेश पाटील, गुणवंत पाटील, रमेश माळी, बंडू कोद्रे, माधव घोडके, मुसा शेख यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.




























































