मुंबई विद्यापीठाचे नामकरण

27

>>चंद्रकांत पाटणकर<<

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने सोलापूर विद्यापीठाचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामांतर करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी अशाप्रकारे  नामांतर करण्याचे निर्णय  सरकारने घेतले आहेत. परंतु ज्या नाना शंकरशेट यांच्या योगदानातून १८५७ साली इंग्रज सरकारने सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाची स्थापना केली, त्या मुंबई विद्यापीठाला नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव देण्याची मुंबईकरांच्या जुन्या मागणीकडे महाराष्ट्र सरकार सोयीस्कररीत्या डोळेझाक का करीत आहे? १८१८ मध्ये मराठय़ांच्या स्वराज्याचा सूर्य मावळल्यानंतर इंग्रजांचे परकीय सरकार आणि स्वकीय जनतेमध्ये दुवा साधण्याची अभूतपूर्व कामगिरी नाना शंकरशेट यांनी केली. त्या काळात शाळा, महाविद्यालये यांची उणीव असतानाही नानांनी वयाच्या २१ व्या वर्षी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले. पुढे इंग्रज सरकारचे प्रथम गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिस्टन यांच्या सहकार्याने १८२२ साली ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. त्यासाठी नानांनी त्यांचे समविचारी सहकारी बाळ गंगाधर शास्त्र्ााr जांभेकर, सदाशिव छत्रे, डॉ. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, आत्माराम तर्खडकर, जगन्नाथ शास्त्र्ााr अशा विद्वान मंडळींना बरोबर घेऊन इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत ठिकठिकाणी शाळा काढल्या. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या निधनानंतर नानांच्या पुढाकाराने देशात उच्च शिक्षणाचा पाया रचण्यासाठी एलफिन्स्टन टेक्निकल स्कूलबरोबर एलफिन्स्टन महाविद्यालयाची निर्मिती केली. त्यानंतर ग्रॅण्ड मेडिकल महाविद्यालय मुंबईतील पहिले टाऊन हॉल हे सभागृह, स्त्र्ायांसाठी प्रसूतिगृह, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थांपासून ते हिंदू स्मशानभूमीची संकल्पना आणि निर्मितीसुद्धा नानांच्या पुढाकाराने करण्यात आली. मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचणाऱ्या, नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांच्यासारख्या शिक्षणमहर्षीचे नाव मुंबई विद्यापीठाला देणे सर्वार्थाने योग्य ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या