राजकीय घडामोडींबाबत चंद्रकांत पाटील अनभिज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल मला काहीच माहिती नाही. यातील बऱयाच गोष्टी मला माध्यमांमधूनच कळत आहेत. मला हे सर्व पत्रकारांकडूनच कळत आहे. मला टीव्ही बघायलाही वेळ नाही असा आव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आणला.

शिवसेना आमदारांचे बंड आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, पण या सर्व घडामोडी मला माध्यमातूनच कळत आहेत असा दावा त्यांनी केला.

रात्री-बेरात्री दिल्लीला निघतात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱयाबाबत विचारले असता त्यांच्या दिल्ली भेटी नियमित सुरू असतात. त्यांच्या कामाला वेग आहे. भेटीची वेळ मिळाली की ते लगेच रात्री-बेरात्री निघतात. राज्यात स्थिर सरकार द्यायला भाजप पुढे येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ‘नाही’ असे उत्तर त्यांनी दिले.