चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (91) यांचे आज संभाजीनगर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.

पती गिरणी कामगार असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना सरस्वती पाटील यांनी मुलांवर चांगले संस्कार घडवले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.