माझ्या बॅगेत आठ शर्ट, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो! – चंद्रकांत पाटील

माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो. तिसऱया मिनिटाला कामाला लागतो. मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो अशी ‘योजना’च उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. पाटील यांच्या या वक्तव्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर 15 ऑक्टोबरला सोलापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर भीम आर्मीने शाईफेक केली. राज्य सरकारच्या पंत्राटी धोरणाचा निषेध नोंदवत ही शाईफेक करण्यात आली. आज चंद्रकांत पाटील अमरावती दौऱयावर आले होते. त्यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवर वक्तव्य केले.