आमच्याशिवाय राज्यात सत्तास्थापना अशक्य; भाजपचा पुन्हा दावा

1657
chandrakant-patil
फाईल फोटो

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्शवभूमीवर भाजपची बैठक झाली. या बैठकीत भाजपच राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असून आम्हीच सत्ता स्थापन करू असा दावा भाजपने पुन्हा केला आहे. भाजपच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्याकडे 119 आमदार असल्याचा दावाही पाटील यांनी केला. सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यात आम्हीच सरकार स्थापन करणार असा विश्वास फडणवीस यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यात भाजपच स्थिर सरकार देणार असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यात आमच्याशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याचेही ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या