
चंद्रपूरातील बल्हारपूर वनक्षेत्रातील कारवा बीटातील कक्ष क्रमांक 500 मध्ये वाघीणीचा शव आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत वाघीण पाच वर्षांची असावी असा अंदाज वनविभागाने वर्तविला असून तिचा मृत्यू चार दिवसांपुर्वी झाल्याची शक्यता आहे. मृत्यूचे खरे कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान तज्ञांच्या मार्गदर्शनात वाघीणीचे शवविच्छेदन करण्यात आले. वनरोपवाटीकेत शवाला जाळण्यात आले असून व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. वनविभाग अधिक तपास करीत आहे.




























































