विजय वडेट्टीवार यांनी घेतला ब्रम्हपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवाई दौरा करून परिस्थितीचा आढावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरणाच्या पाणी विसर्गाने महापुराची स्थिती निर्माण केली आहे. वैनगंगा नदीकाठच्या शेकडो गावांना पुराने वेढले आहे. यातील पंधरा गावे अतिबाधित आहेत या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून दुमजली घरे देखील बुडाली आहेत. या सर्व गावांमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे खाद्य पाकिटे व पाणी पोहोचविले गेले. गेले तीन दिवस हा भाग पूरग्रस्त आहे .राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची हवाई पाहणी केली तेव्हा परिस्थिती अपेक्षेपेक्षाही बिकट असल्याचे पुढे आले आहे. आगामी काळात विसर्ग कमी होणार असला तरी नागरिकांची पुराच्या वेळी त्यातून सुटका करण्यासाठी अधिक ठोस प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या