चंद्रपूर – दाट वस्तीत कोरोनाबाधित रुग्ण सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरातील भिवापूर या दाट वस्तीत शुक्रवारी एक कोरोनाबधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. या 62 वर्षीय व्यक्तीला आधी सारीचा आजार झाल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची लक्षणं बघून स्वॅब घेतला असता तो कोविड रुग्ण निघाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भिवापुरातील त्याच्या घर परिसराला प्रतिबंधित करण्यात आलं.

शनिवार सकाळपासूनच आशा वर्कर इथे राहणाऱ्या लोकांकडे चौकशी करण्याच्या कामाला लागल्या असून, स्वच्छता कर्मचारी जंतुनाशक फवारणी करीत आहेत. हा रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला, त्याचाही मागोवा घेतला जात आहे. सध्या जिल्ह्यात 27 रुग्ण झाले असून यातील 22 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. परिस्थिती आटोक्यात असली, तरी येणारा पावसाळा लक्षात घेता प्रशासन अतिशय काळजीपूर्वक पावलं उचलत आहे.