
सोमवारी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पथके त्यांच्या मतदान केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. 4 कर्मचाऱ्यांचे एक पथक अशा प्रकारे प्रत्येक मतदान केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची रचना करण्यात आली आहे.
रविवार सकाळपासून ही मतदान पथके उपविभागीय कार्यालयातून मतदानाचे साहित्य देऊन रवाना करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 18 लाख 76 हजार मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या साठी 2098 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर एकूण 10 हजार 600 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 4466 पोलीस तैनात करण्यात आले आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, निम लष्करी दले, कमांडो 60 आणि दंगा नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी 2 पथकांचा समावेश आहे.





























































