चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळल्यामुळे तिघांताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील पाटण, चिखली दोन महिलांचा मृत्यू झाला तर मारई पाटण येथिल एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. वंदना चंदू कोटनाके, भारुला अनिल कोरांगे ,चंद्रकांत टोपे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर तीन जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , शेतीची कामे आटोपून पाच महिला घराकडे निघाल्या होत्या.त्या दरम्यान विज कोसळली. यात वंदना चंदू कोटनाके, भारूला अनिल कोरांगे या महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जिवती तालुक्यातील दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. चंद्रकांत ठुमके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मारईपाटण येथील शेतकरी चंदकांत ठुमके हे शेतात काम करीत होते. याचदरम्यान वीज कोसळली. यात ते जखमी झाले. त्यांना गडचांदुर येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला.या दुदैवी घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.